Home About Book Appointment Services Health Packages Preventive Care Ayurveda Gallery & Videos Academics Blog Contact
Back to Blog
Latest September 3, 2026

प्रत्येक छातीमध्ये दुखणं हे हार्ट अटॅक असेलच असं नाही

प्रत्येक छातीमध्ये दुखणं हे हार्ट अटॅक असेलच असं नाही
प्रत्येक छातीमध्ये दुखणं हे हार्ट अटॅक असेलच असं नाही. परंतु, ते पित्त म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणं हे देखील योग्य नाही. बऱ्याचदा छातीमध्ये जे दुखतं ते पित्त म्हणून अंगावर काढल्या जातं. परंतु काही लोकांमध्ये, विशेषतः ज्यांना मधुमेह आहे, अशा लोकांना छातीमध्ये दुखत नाही किंवा दुखलं तरी पित्त झाल्यासारखं थोडसं जळजळ होतं. पण actually तो heart attack असतो. त्यामुळे हे तुम्हाला रोगाचे कुठले-कुठले लक्षणं आहेत यापेक्षा तुम्हाला कुठले-कुठले आजार आहेत यावर अवलंबून असतं. तुम्हाला diabetes असेल, BP असेल, तर छातीमध्ये दुखणं हे हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. आजकाल आपल्या देशामध्ये कमी वयाच्या मुलांना व्यसनामुळे diabetes, BP नसतानाही heart attack येतात. त्यामुळे प्रत्येक वेळी छातीत दुखणं म्हणजे पित्त नाही, हा हृदयरोगाचा धोका असू शकतो. त्यामुळे जर छातीमध्ये दुखलं तर doctor चा सल्ला घेणं, स्वतःचा ECG करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
Dr. Chandrakant Kadam
Director | D.M.CARDIOLOGY