Home About Book Appointment Services Health Packages Preventive Care Ayurveda Gallery & Videos Academics Blog Contact
Back to Blog
Latest August 18, 2026

शाळेच्या परिसरात सरकारने जंक फूडवर बंदी घातलीये. नेमकं कारण काय?

शाळेच्या परिसरात सरकारने जंक फूडवर बंदी घातलीये. नेमकं कारण काय?
* आजकालच्या लहान मुलांचा आहार बघितला तर काय हो? जंक फूड. मग हे पदार्थ लहान मुलांच्या शरीराला किती पोषण देणार आहेत? * आयुर्वेद शास्त्र सांगतं की अति स्निग्ध म्हणजेच ऑईल जास्त असलेले पदार्थ, अति गोड, अति प्रमाणात मीठ असलेले पदार्थ, त्याचप्रमाणे ज्या पदार्थांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर केलेला आहे किंवा प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर केलेला आहे, अशी सगळी पदार्थ तुमची पचनाची प्रक्रिया मंद करते. * आणि ही पचनाची प्रक्रिया मंद झाली की शरीरात 'आम' तयार होतो. 'आम' म्हणजेच पचन न झालेला तुमच्या आहाराचा भाग, हा नंतर शरीरात वेगवेगळे व्याधी तयार करतो. * मग तुम्हीच ठरवा, सरकारने ही जंक फूडवर घातलेली बंदी म्हणजे तुमच्या मुलांचं स्वातंत्र्य हिरावणं आहे की उद्याच्या निरोगी भविष्याची केलेली सुरुवात आहे?
Dr. Sangeeta Kadam
B.A.M.S MD PGDEMS