११ नंतर जागत असाल तर तुमच्या शरीराला त्याची किंमत नक्कीच मोजावी लागणार आहे.
रात्री ११ नंतर जागत असाल, तर तुम्हाला या हार्मोनल इमबॅलन्सचे परिणाम भोगावे लागतील.
हार्मोनल इमबॅलन्स म्हणजे काय? किंवा हार्मोनल इमबॅलन्समुळे कुठले चेंजेस दिसू शकतात?
* तर मुलांमध्ये चिडचिडेपणा जाणवणं.
* थोडं काम केलं तरी थकवा जास्ती जाणवणं.
* मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये पाळीच्या तक्रारी किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येणं.
असे अनेक प्रॉब्लेम्स यामध्ये समाविष्ट होतात.
आता जेव्हा तुम्ही ११ नंतर जागताय, तर बेसिकली ११ ते १ हा पित्ताचा काळ आहे. आणि ह्या काळामध्ये तुमच्या शरीरामध्ये जे काही तुम्ही खाताय ते पचन होण्याचा काळ असतो.
जर पचनासाठी आवश्यक असलेला रक्तपुरवठा इतर इंद्रियांसाठी जर शरीराकडनं वापरला गेला, तर पचन बिघडलं जातं. त्यामुळे रात्री किंवा शिफ्ट ड्युटी करणाऱ्या वर्कर्समध्ये पचनाचे अनेक विकार झालेले आढळून येतात.
जेव्हा जागरण होतंय, तेव्हा तुमच्या डोळ्यांना प्रचंड ताण जाणवतो. त्याचबरोबर तुमच्या मेंदूलाही अतिरिक्त ताण सहन करावा लागतो.
ह्यामुळे काय होतं? तुम्ही मानसिकदृष्ट्या छोट्या-छोट्या गोष्टींना इरिटेट व्हायला लागता, चिडचिड करायला लागता.
जर तुमचा स्क्रीन टाईम जास्ती असेल, तर त्याचा परिणाम तुमच्या बुद्धीवर, तुमच्या ग्रास्पिंग पॉवरवर नक्कीच होतो.
म्हणून जागरण करण्यापेक्षा १० ते १०:३० च्या सुमारास झोपणं कधीही शरीरासाठी चांगलंच आहे.
Dr. Sangeeta Kadam
B.A.M.S MD PGDEMS